राज्यात बुधवारपर्यंत बरसणार अवकाळी पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज | पुढारी

राज्यात बुधवारपर्यंत बरसणार अवकाळी पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील कमाल तापमनाचा पारा कमी झाला आहे. मात्र, अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

राज्यात शनिवारी वर्धा येथे कमाल तापमानाचा पारा 42.8 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. तर उर्वरित शहराचा तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा राहणार असला, तरी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा:

Congress Chief Nana Patole : काँग्रेसमध्येही फिरणार भाकरी! संघटनात्मक फेरबदलांची हालचाल सुरु; नाना पटोले

Monsoon Updates | मान्सून गोव्याच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार

Murali Sreeshankar : लांब उडीत मुरली शंकरने रचला इतिहास! पॅरिसमध्ये जिंकले कांस्यपदक

 

Back to top button