पुणे: ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार | पुढारी

पुणे: ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा : वारुळवाडीच्या (ता. जुन्नर) दिशेला येणाऱ्या दुचाकीला चिमणवाडीजवळ ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही माहिती दिली.

भागुजी बजाबा गुंजाळ (वय ६१) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गेनभाऊ बजाबा गुंजाळ (वय ८४, रा. चास ठाकरवाडी, ता. आंबेगाव) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता भागुजी गुंजाळ हे दुचाकीवरून (एमएच ०१ एचए ४३४८) वारुळवाडीच्या दिशेला येत असताना ट्रकची (एमएच १४ केए ७९५३) दुचाकीला धडक बसली. त्यात भागुजी गुंजाळ ठार झाले. याप्रकरणी ट्रकचालक सुभाष तुकाराम काळे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button