बारावीत यंदाही मुलीच भारी; मुलांपेक्षा 4.75 टक्के अधिकची आघाडी | पुढारी

बारावीत यंदाही मुलीच भारी; मुलांपेक्षा 4.75 टक्के अधिकची आघाडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल (2023) मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागाचा निकाल घटला आहे. गेल्या वर्षी पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के लागला होता. यंदा तो घसरून 92.07 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 1.54 टक्क्यांनी घट आहे. निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

बारावीच्या निकालात सोलापूर पहिल्या स्थानी, अहमदनगर दुसर्‍या, तर पुणे विभाग तिसर्‍या स्थानी आहे. पुणे विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.71 टक्के आहे, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89.96 टक्के एवढे आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे
प्रमाण 4.75 टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे विभागातून 2 लाख49 हजार 429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 2 लाख 47 हजार 343 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 लाख 27 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात यावर्षी 1 लाख 10 हजार 966 विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 10 हजार 100 विद्यार्थीनी परीक्षेला बसल्या होत्या.

त्यापैकी 1 लाख 4 हजार 278 मुली उत्तीर्ण झाल्या. विभागातून 1 लाख 38 हजार 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 37 हजार 243 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 1 लाख 23 हजार 473 मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागातून 6 हजार 651 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 86 असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 46.39 आहे.

सोलापूर जिल्हा अव्वल…

पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.69 टक्के लागला आहे. तर त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 92.63 टक्के ऐवढा लागला आहे. विभागात सर्वात कमी निकाल पुणे जिल्ह्याचा लागला असून, तो 91.14 टक्के एवढा आहे. सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 719 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 50 हजार 334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 93.69 टक्के एवढा लागला आहे. पुणे जिल्ह्यातून एकूण 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यापैकी 1 लाख 19 हजार 927 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 91.14 टक्के एवढा लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून 62 हजार 739 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 58 हजार 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 92.63 टक्के लागला आहे. विभागातील तीनही जिल्ह्यांत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून, यंदाही निकालात मुलींचे वर्चस्व कायम राहिले.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती

आंबेगाव : 93.56
बारामती : 93.73
भोर : 93.77
दौंड : 92.91
हवेली : 92.26
इंदापूर : 95.30
जुन्नर : 91.96
खेड : 90.84
मावळ : 87.28
मुळशी : 94.39
पुणे शहर -पश्चिम : 88.64
पुरंदर : 93.18
शिरूर : 94.77
वेल्हा : 94.17
पुणे शहर : पूर्व : 88.24
पीसीएमसी : 93.28
एकूण – 91.14

जिल्हानिहाय निकाल
पुणे – 91.14
अहमदनगर – 92.63
सोलापूर – 93.69
एकूण – 92.07

जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
पुणे – 1 लाख 19 हजार 297
अहमदनगर – 58 हजार 120 विद्यार्थी
सोलापूर – 50 हजार 334 विद्यार्थी

शाखानिहाय निकाल

विज्ञान – 96.11
कला – 84.47
वाणिज्य – 91.22
व्यवसाय अभ्यासक्रम – 91.13
आयटीआय -92.31
एकूण निकाल – 92.07

Back to top button