विधी तीन वर्षे सीईटी परीक्षेला 8 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी | पुढारी

विधी तीन वर्षे सीईटी परीक्षेला 8 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलव्दारे घेण्यात येणार्‍या तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला पहिल्या दिवशी मंगळवारी 7 हजार 980 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी सकाळी 104 , दुपारी 114 आणि सायंकाळी 108 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

तिन्ही सत्रांसाठी राज्यात 46 हजार 421 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 38 हजार 431 विद्यार्थी उपस्थित होते. तिन्ही सत्रांची मिळून 82.79 टक्के उपस्थिती होती, तर 7 हजार 980 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. दरम्यान, आज दि. 3 मे रोजी विधी तीन वर्षे तसेच बीपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलव्दारे कळविण्यात आले आहे.

Back to top button