डेक्कन क्वीनच्या दोन डब्यांखाली आग…मंकी हिलच्या पुढे घडली घटना | पुढारी

डेक्कन क्वीनच्या दोन डब्यांखाली आग...मंकी हिलच्या पुढे घडली घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातून मुंबईकडे प्रवाशांना घेऊन जात असताना गुरूवारी डेक्कन क्वीनच्या दोन डब्यांखाली आग लागल्याची घटना घडली. मंकी हिलच्या पुढे टेक्निकल हॉल्ट घेऊन कर्जत स्थानकाकडे जात असताना ही घटना घडली. फर्स्ट क्लास पासधारकांच्या सी 1, सी 2 या दोन डब्यांखाली आग लागल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.

त्यांनी रेल्वे गाडीची चेन ओढून तात्काळ गाडी थांबविली. अन गाडीतील गार्डसहा इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. त्यावेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणले. आग आटोक्यात आणल्यावर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान ही आग चाकाखाली झालेल्या घर्षणामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button