पुणे बाजार समिती निवडणूक : ‘त्या’ अपिलावर आज निर्णय अपेक्षित | पुढारी

पुणे बाजार समिती निवडणूक : ‘त्या’ अपिलावर आज निर्णय अपेक्षित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील चार उमेदवारांच्या अर्जमंजुरीविरोधात पणन संचालकांकडे दाखल अपिलावर सोमवारी (दि. 17) सुनावणी झाली आहे. त्यावर मंगळवारी (दि. 18) सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित असून, संबंधित उमेदवारांबाबत पणन संचालक नेमका काय आदेश देणार? याकडे बाजारवर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील विकास सोसायटी मतदारसंघ गटातून बाजार समितीचे माजी सभापती व निवडणुकीतील उमेदवार दिलीप काळभोर (लोणी काळभोर), प्रकाश जगताप (जगतापवस्ती, आष्टारपूर), रोहिदास उंंद्रे (मांजरी खुर्द) आणि माजी संचालक राजाराम कांचन (उरुळी कांचन) यांचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

त्याविरोधात चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी, ता. हवेली) यांनी पणन संचालकांकडे अपील दाखल केले आहे. त्याद्वारे त्यांनी बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त संचालक मंडळातील सदस्यांना सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यावर सोमवारी पणन सहसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडे सुनावणी झाली आहे.

Back to top button