पुणे : पळसदेव सरपंच निवडीकडे लागले लक्ष | पुढारी

पुणे : पळसदेव सरपंच निवडीकडे लागले लक्ष

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”10″ order=”DESC” orderby=”post_date” view=”circles” /]

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच इंद्रायणी सुजित मोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाची निवडणूक येत्या सोमवारी (दि. 17) पळसदेव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. यामुळे पळसदेव ग्रामपंचायतीत ठरल्याप्रमाणे होणार की सत्तेत बदल घडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लागून राहणार आहे.
गेले काही दिवसांपासून पळसदेवमधील सत्ताधारी गटातील गटबाजीमुळे सरपंचपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. पळसदेव-बिजवडी गटातील पळसदेवचे माजी उपसरपंच मेघराज कुचेकर व माजी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सोनाली कुचेकर पाटील हे गटबाजीला कंटाळून वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीमधील बलाबल पाहता सत्ताधारी गटाचे आठ व विरोधी गटाचे सात सदस्य आहेत. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. सरपंचपदाच्या राजीनाम्यानंतर आता गावातील विरोधकांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीवर बलाबल सिध्द करण्यासाठी विरोधकांना एका सदस्याची आवश्यकता आहे. यामुळे गावातील राजकीय समिकरणे बदलणार काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. याशिवाय सरपंचपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी प्रत्येकाचीच चाचपणी सुरू आहे.

[web_stories title=”true” excerpt=”true” author=”false” date=”true” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”DESC” orderby=”post_date” view=”list” /]

सन 2021 मध्ये झालेल्या पळसदेव ग्रामपंचायत निवडणुकीत मेघराज पाटील कुचेकर यांचा सत्ताधारी गटाच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यावेळी सत्ताधारी गटाच्या 8 सदस्यांनी एकत्रित येत सरपंचपदाचा कालावधी वाटून घेतला होता. या वाटपानुसार दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकार्‍यांकडे दिला. तेव्हापासून गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. यासंदर्भात कुचेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रविवारी माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी भेटून आपला निर्णय त्यांना कळवणार आहे. तसेच रविवारीच पळसदेव येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधून पळसदेवंच्या ग्रामस्थांना आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Back to top button