पिंपरी : अर्ध्या तासात तब्बल 28 तोळे सोने लंपास | पुढारी

पिंपरी : अर्ध्या तासात तब्बल 28 तोळे सोने लंपास

पिंपरी : घराच्या बंद स्टोअर रूमचा कोयंडा तोडून चोरट्याने डाव साधत अर्ध्या तासात तब्बल 28 तोळे सोने, दोन लाख 25 हजार रुपये असा 12 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी (दि. 9) तीन ते साडेतीनच्या दरम्यान आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी वंदना सुरेश शिनकर (58, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या स्टोअर रूमचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाट, लॉकरमध्ये ठेवलेले नऊ लाख 80 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच दोन लाख 25 हजार रुपये असा एकूण 12 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Back to top button