पुणे आरटीओकडून वर्षभरात 20 हजार वाहनांवर कारवाई | पुढारी

पुणे आरटीओकडून वर्षभरात 20 हजार वाहनांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आर्थिक वर्षात मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 20 हजार 482 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सर्वाधिक कारवाई इन्शुरन्स आणि रिफ्लेक्टर, दिवे नसणार्‍या वाहनांवर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

आरटीओने ताफ्यातील वायुवेग पथकांच्या माध्यमातून एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत ही कारवाई केली आहे. यात पुणे शहर आणि विभागामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. इन्शुरन्स नसणे तसेच रिफ्लेक्टर, दिवे, सीट बेल्ट नसणे असे प्रकार समोर आले आहेत.

अशी केली कारवाई
हेल्मेट – 3 हजार 693
सीट बेल्ट – 1 हजार 949
गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे – 1 हजार 199
इन्शुरन्स नसणे – 5 हजार 903
सिग्नल तोडणे/लेन कटींग –
2 हजार 69
ट्रकमधून अवैध प्रवासी वाहतूक – 23
ओव्हरलोड – 1 हजार 102
रिफ्लेक्टर/ दिवे नसणे –
4 हजार 491
अन्य – 53
एकूण वाहने – 20 हजार 482

पुणे कार्यालयांतर्गत 4 वायुवेग पथके आहेत. त्यांच्यामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत असते. रस्ते वाहतूक सुरक्षित राहावी, या उद्देशाने आर्थिक वर्षात तब्बल 20 हजार 482 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
                                         – संजीव भोर,
                     उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Back to top button