पुणे : नव्या योजनांमुळे एसटी सुसाट ! | पुढारी

पुणे : नव्या योजनांमुळे एसटी सुसाट !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अनेकांना नेहमीच प्रश्न पडतो, एवढ्या योजना राबविल्या तर एसटी महामंडळ आणखी घाट्यात जाईल. मात्र, तसे होणार नसून, नव्या योजनांचा एसटी महामंडळाच्या प्रवाशांमध्ये आणि उत्पन्नात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या योजनेमुळे एसटीच्या रोजच्या प्रवाशांमध्ये 5 लाखांनी वाढ झाली असून, शासनाच्या मिळणार्‍या प्रतिपूर्ती रक्कमेतसुध्दा 70 ते 75 कोटींनी वाढ झाली आहे.

एसटी महामंडळ विविध प्रकारच्या 29 योजना राबविते. त्या योजनांच्या बदल्यात शासनाकडून 140 कोटी रुपयांपर्यंतची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाला मिळते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेमुळे एसटी महामंडळाला दुप्पट फायदा झाला आहे. 140 कोटींच्या प्रतिपूर्ती रकमेत 75 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे एसटीला आता 210 ते 215 कोटी रुपयांपर्यंत महिना प्रतिपूर्ती रक्कम मिळत आहे. त्यासोबतच या नव्या योजनांचा लाभ घेणार्‍या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे.

Back to top button