इंदापूर : भरभरून देणारा अर्थसंकल्प : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील | पुढारी

इंदापूर : भरभरून देणारा अर्थसंकल्प : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी व महिला यांच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक नावीन्यपूर्ण योजना अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना- भाजप युती सरकारचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला.

शेतकर्‍यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मिळणार्‍या 6 हजार रुपयांबरोबर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना आता फक्त 1 रुपया भरून मिळणार आहे.

तसेच मागेल त्या शेतकर्‍याला शेततळे व फळबागा, ठिबक सिंचन, अस्तरीकरण आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच महा कृषी विकास अभियान योजना जाहीर करून 5 वर्षांसाठी या योजनेसाठी 3 हजार कोटींची तरतूद केली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण व दूरदृष्टीचा हा अर्थसंकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Back to top button