भोर मतदारसंघासाठी 27 कोटींचा निधी मंजूर | पुढारी

भोर मतदारसंघासाठी 27 कोटींचा निधी मंजूर

भोर : राज्याच्या अर्थसंकल्प सन 2022-23 अंतर्गत भोर विधानसभा मतदारसंघातील 27 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. यामुळे डोंगर भागातील रस्ते चकाचक होऊन असून, दळणवळणाचे मार्ग जोडले जाणार आहेत.

मंजूर झालेल्या निधीतून होणारी कामे पुढीलप्रमाणे : शिरगाव ते राकुढली (3 कोटी ), मोहरी ते हातवे (2 कोटी), महाड-मढेघाट-वेल्हे-नसरापूर-चेलाडी (5 कोटी), पौड-कोळवण-काशिंग-जवण-फागणे धरण रस्ता येथील वळकी नदीवरील कमकुवत मोठ्या पुलाची पुनर्बांधणी करणे (ता. मुळशी, 13 कोटी), पानशेत-साईव-मोसे रस्ता प्रजिमा (ता. मुळशी, 4 कोटी रुपये) आदी कामे मंजूर करण्यात आल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

Back to top button