पुुणे : शहरात मार्चमध्ये बारा वर्षांत दोन वेळा धो-धो पाऊस | पुढारी

पुुणे : शहरात मार्चमध्ये बारा वर्षांत दोन वेळा धो-धो पाऊस

पुुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मार्च महिन्यातील गेल्या बारा वर्षांचा पावसाचा ताळेबंद तपासला असता, दोन वेळा धो-धो पावसाची नोंद झाली आहे. तसेच, कमाल तापमानाचा विक्रम 31 मार्च 2019 रोजीचा असून, त्या दिवशी 40.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. तर, 20 मार्च 2019 रोजी शहरात 44.1 मि.मी इतक्या विक्रमी पावसाची नोंद आहे.

वर्षभरात 30 वेळा वादळी वारे..
शहरातील वादळी वार्‍याचा ताळेबंद हवामान विभागाच्या नोंदीत तपासला असता असे दिसते, की शहरात वर्षभरात 30 वेळा वादळी वारे येते. त्यात सर्वाधिक वादळी वारे मे (4 वेळा), जून (6 वेळा), जुलै (4 वेळा), ऑगस्ट (4 वेळा), सप्टेंबर (5वेळा), ऑक्टोबर (6 वेळा) आल्याची नोंद आहे. मात्र, त्याचा जोर नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत कमी असतो. मार्च महिन्यात केवळ दीड दिवस वादळी वारे आल्याची नोंद आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरणात मोठा बदल होऊन दर वर्षी मार्च महिन्यात पाऊस पडतोच, असा अनुभव आहे. शहरातील मार्च महिन्यातला सरासरी पाऊस 3.1 मिलिमीटर इतका आहे. शहरातील गेल्या बारा वर्षांचा मार्च महिन्यातील पावसाचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते, की बारा वर्षांत केवळ दोन वेळा 30 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 20 मार्च 2015 रोजी 44 मि.मी.हा गेल्या दहा वर्षांतला विक्रम आहे. तर, त्या पाठोपाठ 27 मार्च 2016 रोजी 30 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button