शिरूर : बनावट पावती दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

शिरूर : बनावट पावती दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : माथाडी बोर्डची सही-शिक्का नसलेली बनावट पावती दिल्याबद्दल दोघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. इम्तियाज मुस्ताक साह (रा. कळंबोली, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल शिवाजी मलगुंडे व प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे (दोघे रा. ढोक सांगवी, ता. शिरूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रांजणगाव एमआयडीसीतील झामिल स्टील इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गेटबाहेर सोमवारी (दि. 6) सकाळी 10 च्या सुमारास साह व ड्रायव्हर मोहम्मद सुलतान वकील खान हे ट्रक (क्र. एम. एच. 46 बी. एम. 4471 व एम. एच. 46 बी. यू. 3863) मध्ये लोखंडी कॉईल भरून झामील स्टील इंडिया प्रा. लि. कंपनीत खाली करण्यासाठी आले होते.

त्या वेळी अमोल व प्रज्वल यांनी गाडी खाली करण्यासाठी माथाडी बोर्डाची पावती फाडावी लागेल, असे सांगून प्रत्येकी चारशे रुपये असे एकूण आठशे रुपयांची खंडणी घेतली. तसेच जय मल्हार इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या माथाडी बोर्डाचा सही-शिक्का नसलेल्या बनावट पावत्या दिल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनोद शिंदे करीत आहेत.

Back to top button