पुणे : लिंक क्लिक करताच पावणेतीन लाख लंपास | पुढारी

पुणे : लिंक क्लिक करताच पावणेतीन लाख लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सायबर चोरट्याने ‘कस्टमर सपोर्ट’ नावाची लिंक पाठवून एका व्यक्तीला 2 लाख 89 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी, आंबेगाव बुद्रुक येथील 48 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
सायबर चोरट्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 24 ते 26 मार्च या कालावधीत घडली. सायबर चोरट्याने फिर्यादींच्या मोबाईलवर ‘कस्टमर सपोर्ट’ नावाची एक लिंक पाठवली. ती लिंक फिर्यादीने क्लिक केली. मात्र, या वेळी त्यांनी कोणताही व्यवहार केला नाही तसेच कोणताही गोपनीय क्रमांक शेअर केला नाही, तरीही त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी 2 लाख 89 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेण्यात आले.

Back to top button