राहुल कलाटे आणि भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोन गटात हाणामारी | पुढारी

राहुल कलाटे आणि भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोन गटात हाणामारी

पिंपरी : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. भाजप, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

मात्र या पोटनिवडणुकीला गालबोट लागला आहे. आज मतदान सुरु होताच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक गणेश जगताप आणि भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यात हाणामारी झाली. ही घटना पिंपळे गुरव येथील मतदान केंद्र 353/ 354 वर घडली. पोलिसांनी वेळीच मध्यस्ती करून वाद मिटवला असला तरी या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button