सावधान! शहरात टायफॉईड वाढतोय; मान्सूनच्या सुरुवातीलाच 6 लहान मुलांना टायफॉईड

सावधान! शहरात टायफॉईड वाढतोय; मान्सूनच्या सुरुवातीलाच 6 लहान मुलांना टायफॉईड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गेल्या आठवड्यात 12 लहान मुलांना टायफॉईडची लक्षणे दिसल्याने अ‍ॅडमिट करण्यात आले होते. यापैकी सहा जणांमध्ये टायफॉईडचे निदान झाले. मान्सूनच्या सुरुवातीलाच लहान मुलांमध्ये टायफॉईडचा धोका वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवार पेठेतील सदानंदनगर या एकाच इमारतीतील 5 ते 10 वर्षे वयोगटातील 12 मुलांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर चार मुले बरी झाली. टायफॉईडसारखी लक्षणे असलेल्या आणखी तीन मुलांना रविवारी कमला नेहरू हॉस्पिटलच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आले. या तीन मुलांपैकी कोंढवा येथील रहिवासी असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलीला टायफॉईडची लागण झाली.

सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, सदानंदनगर इमारतीतील मुलांच्या आजारात वाढ झाल्याने पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नळातून गोळा केलेले पाण्याचे नमुने स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहेत. पाण्याच्या टँकरमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल येणे
बाकी आहे.

अशी घ्या काळजी

  • पावसाळ्यात मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते आणि ते वारंवार आजारी पडतात. त्यासाठी फ्लूची लस देणे गरजेचे आहे.
  • शाळा सुरू झाल्यावर मुले एकमेकांच्या संपर्कात आल्याने संसर्गाची शक्यता वाढते. त्यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे.
  • मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्त्वाचे तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे आहे.
  • मुलांना मैदानी खेळ खेळू देणे, व्यायाम करणे आवश्यक.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news