Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘तेजी’ची धूम कायम, सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेताचे सकारात्‍मक पडसाद देशांतर्गत शेअर बाजारावर उमटले आज ( दि.१८ जून) सेन्सेक्स-निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही नवीन विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स 243 अंकांच्या वाढीसह 77,235 वर उघडला आणि उघडल्यानंतर 77,326 च्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टी 105 अंकांनी वाढून 23,570 वर उघडला आणि 23,573 वर गेला. निफ्टी बँक 192 अंकांच्या वाढीसह 50,194 वर उघडली, तथापि, निफ्टी बँकेत कमजोरी दिसून आली आणि ती 270 अंकांनी घसरली. संरक्षण समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.

आज व्‍यवहार सुरु हाेताच काय घडलं?

  • सेन्सेक्स 243 अंकांनी वाढून 77,235 वर उघडला.
  • निफ्टी 105 अंकांनी वाढून 23,570 वर उघडला
  • निफ्टी बँक 192 अंकांनी वाढून 50,194 वर उघडला
  • रुपया ८३.५६/$ च्या तुलनेत ८३.५१/$ वर उघडला

जागतिक बाजाराचे सकारात्‍मक परिणाम, देशांतर्गत बाजार सुसाट

जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांदरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारातही चांगली वाढ दिसून येत आहे. अमेरिकेच्या S&P आणि Nasdaq ने रेकॉर्ड बंद केले. याशिवाय कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्सही कमी करण्यात आला आहे. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही खरेदीचा कल आहे. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी होत आहे. या सगळ्यामुळे आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 2.04 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.04 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.4 लाख कोटींची वाढ

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 14 जून 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,34,88,147.51 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 18 जून 2024 रोजी बाजार उघडताच तो 4,36,92,883.04 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात २.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी 25 ग्रीन झोनमध्ये आहेत. विप्रो, इन्फोसिस आणि एमअँडएममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, मारुती, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेत सर्वाधिक घसरण झाली आहे. खाली तुम्ही सेन्सेक्सवर सूचीबद्ध सर्व समभागांच्या नवीनतम किंमती आणि आजच्या चढउतारांचे तपशील पाहू शकता-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news