पुणे : बाजार समितीसाठी 17 हजार मतदार बजावणार हक्क | पुढारी

पुणे : बाजार समितीसाठी 17 हजार मतदार बजावणार हक्क

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 18 जागांसाठी 17 हजार 419 जण मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. एक मार्चपर्यंत या प्रारूप यादीवर आक्षेप/हरकती नोंदविता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तब्बल 24 वर्षांनी होणार्‍या निवडणुकीत दोन व्यापार प्रतिनिधी निवडीसाठी सर्वाधिक मतदार आहेत. तब्बल 13 हजार 173 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीत 18 पैकी 11 उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत. यासाठी 134 सोसायटीचे 1 हजार 655 सदस्य मतदान करणार आहेत. 4 उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. यासाठी हवेली तालुक्यातील 71 ग्रामपंचायचे 713 सदस्य मतदान करणार आहेत. 2 व्यापारी प्रतिनिधी आणि 1 हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे.

Back to top button