पुणे : शिधापत्रिका प्रणालीत मोबाईल क्रमांक समाविष्ट करा | पुढारी

पुणे : शिधापत्रिका प्रणालीत मोबाईल क्रमांक समाविष्ट करा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट केले जात आहे. त्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च 2023 चे धान्य घेताना समाविष्ट करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. धान्य घेताना दुकानदारांकडे ई-पॉस मशीनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट केले जात आहेत.

यापूर्वी समाविष्ट भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा असल्यास सुधारित क्रमांक तालुका पुरवठा कार्यालयात देऊन प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार आहे. लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालय, परिमंडळ कार्यालय तसेच रास्त भाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

Back to top button