कुरकुंडीच्या मुकाईदेवी यात्रेत रंगणार बैलगाड्यांचा थरार | पुढारी

कुरकुंडीच्या मुकाईदेवी यात्रेत रंगणार बैलगाड्यांचा थरार

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील मुकाई देवीच्या यात्रेनिमित्त धार्मिक विधी, करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा, भजनी भारूड व बैलगाडा शर्यती अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पैकी बैलगाडा शर्यतींसाठी 4 लाख 11 हजार 611 रुपयांची रोख बक्षिसे, 6 दुचाकी, एक खोंड (बैल), 9 एलसीडी, एक कडबाकुट्टी मशीन, पिकांवर औषध मारणारे दोन पंप, 15 चषक आणि सलग तीन वर्ष (2023 ते 2025) प्रथम क्रमांक मिळविणार्‍या बैलगाडा मालकास बोलेरो जीप अशी बक्षिसांची खैरात यात्रा समितीने केली आहे.

मुकाई देवीचा उत्सव दि. 22 ते दि. 26 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. देवीस सकाळी अभिषेक, मांडव डहाळे, हारतुरे, रात्री पालखी मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. करमणुकीसाठी दि. 22 रोजी रात्री साईनाथ कला नाट्य मंडळ, आसखेड बुद्रुक यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 23 रोजी रात्री मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. दि. 24 रोजी सकाळी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याचा सत्कार यात्रा समितीने आयोजित केला आहे.

दि. 25 व दि. 26 रोजी बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे. शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवणार्‍यास 1 लाख 11 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकास 1 लाख 11 हजार रुपये, तृतीय क्रमांक 81 हजार, तर चतुर्थ क्रमांक पटकाविणार्‍यास 51 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. अंतिम शर्यतीत एकूण 6 दुचाकी, एक खोंड (बैल), 9 एलसीडी, एक कडबाकुट्टी मशीन, पिकांवर औषध मारणारे दोन पंप, 15 चषक अशी बक्षिसे आहेत. फळीफोड शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवणार्‍या बैलगाडा मालकास 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये, तृतीय क्रमांक 10 हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकाला 7 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने शर्यतीत सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले

Back to top button