बारामती : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात जमिनीची परस्पर विक्री | पुढारी

बारामती : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात जमिनीची परस्पर विक्री

बारामती; पुढारी वृत्तसेवा : व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून घेतली. ती परस्पर अन्य व्यक्तीला विकत फसवणूक केल्याचा प्रकार उंडवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथे घडला.

याप्रकरणी तिघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीसह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद ज्ञानदेव तावरे (रा. उंडवडी, ता. बारामती), शहाजी मुरलीधर पवार (रा. सोनवडी सुपे) व भारत निवृत्ती भापकर (रा. कारखेल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय बाळासो गवळी (रा. उंडवडी) यांनी याबाबत फिर्याद दिली.

स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ची पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात

#शेतकरी आंदोलन : हरियाणात उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळला

फिर्यादींना २०१४ मध्ये पैशाची गरज होती. पत्नीचा मानलेला भाऊ शरद तावरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली. त्यानुसार, तावरे यांच्याकडून दीड लाख रुपये १० टक्के व्याज दराने दोन महिन्यांच्या बोलीवर घेण्यात आले होते. परंतु दोन महिन्यात पैसे देणे फिर्यादीला शक्य झाले नाही.

ShivSena : ‘प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना संपेल असा प्रयत्न झाला’

Mitali Mayekar : शेअर करायला गेली व्हिडिओ आणि झाली ट्रोल

दुसरीकडून तावरे यांचा पैशासाठी तगादा सुरु होता. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये तावरे हे शहाजी पवार यांना घेवून फिर्यादीकडे गेले. तुमची एक एकर शेतजमिन मुदत खरेदीखताने द्या. तुम्हाला सात लाख रुपये चार टक्के व्याजदराने दोन वर्षांसाठी दिले जातील. असा प्रस्ताव त्यांनी दिला.

रानू मंडल हिने टी-शर्ट घालून गायिले ‘मनिके मागे हिथे’ गाणे

Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!!!

त्यानुसार फिर्यादी हे केडगाव येथे दस्त करण्यासाठी गेले असताना या दोघांनी हा दस्त भारत भापकर यांच्या नावे केल्याचे दिसून आले. शिवाय मुदत खरेदीऐवजी थेट खरेदीखताचा उल्लेख दस्तावर होता. त्यामुळे फिर्यादी तेथून निघून आले.

सप्टेंबरमध्ये १.१७ लाख कोटी जीएसटी वसुली

शरद पवार यांची पुण्यातील सारथीच्या बैठकीला अचानक हजेरी

त्यानंतर या तिघांनी उंडवडी येथे फिर्यादीची भेट घेतली. त्यावेळी फिर्य़ादीने थेट खरेदीखत कसे काय करता? अशी विचारणा केली. त्यावर तुम्हाला पैसे मिळण्याशी मतलब असे सांगत त्यांची समजतू घालण्यात आली. त्यानंतर ५ मार्च २०१५ रोजी खरेदीखत करण्यात आले. त्यापोटी मिळालेल्या रकमेतून तावरे यांनी दीड लाख रुपये व व्याजाची ८० हजारांची रक्कम काढून घेतली.

३० हजार रुपये दस्तासाठी खर्च झाल्याचे सांगत ४ लाख ४० हजार रुपये फिर्यादीला दिले. त्यानंतर सहा महिन्यांनी या तिघांनी सात लाख रुपयांची मागणी फिर्यादीकडे केली. त्यावर दोन वर्षे मुदतीवर पैसे दिले आहेत. तुम्ही पैसे मागू नका असे फिर्य़ादीने सांगितले.

वारंवार त्यांच्याकडून तगादा लावला जावू लागला. भावकीतील संजय मनोहर गवळी यांच्या नावे विसारपावती करत त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये थेट फिर्यादीने तावरे यांना ३ लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर एक एकर जमीन परस्परच निलम राहूल किर्दत यांना विकण्यात आल्याची माहिती फिर्यादीला मिळाली.

त्यांनी या तिघांकडे चौकशी केली. सहा महिन्यात तुझी जमीन परत मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही जमिन परत दिली गेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

महागाईचा झटका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात वाढ

BBM : कॅप्टन्सीसाठी गायत्री दातार पात्र ठरेल का?

जमिनीखाली ३५ फूट खोलीवर हॉलिडे होम 

पाहा व्हिडिओ – ‘एक थी बेगम’ फेम शाहब अलीने पत्रकारिता का सोडली? | Rapid fire With Actor Shahab Ali

Back to top button