रानू मंडल हिने टी-शर्ट घालून गायिले 'मनिके मागे हिथे’ गाणे | पुढारी

रानू मंडल हिने टी-शर्ट घालून गायिले 'मनिके मागे हिथे’ गाणे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन वर्षापुर्वी रानू मंडल लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनली होती. यानंतर हिमेश रेशमिया यांनी रानू मंडल हिला चित्रपटात गाण्याची संधी दिली. परंतु, काही दिवसांच्या स्टारडमनंतर ती पुन्हा गायब झाली. मात्र, सध्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रानू मंडलच्या ‘मनिके मागे हिथे’ (Manike Mange Hite) या गाण्याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रानू मंडलने लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे. याआधी ‘मनिके मागे हिथे’ (Manike Mange Hite) हे गाणे गायक श्रीलंकेची गायिका योहानी यांनी गायिले आहे.

आता रानूचे हे गाणे सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

गायक योहानी यांचे ‘मनिके मागे हिथे’ गाणे

श्रीलंकेची गायिका योहानी हिने ‘मनिके मागे हिथे’ हे गाणे गायिले आहे. हे गाणे जगभरात गाजत आहे.

याआधी दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडलने लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गायिले होते. यानंतर तिला मुंबईतील ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होते.

याशोमध्ये जज म्हणून उपस्थित असलेल्या हिमेश रेशमिया यांनी तिच्या गायनाचे कौतुक करून ‘हॅपी हार्डी’ आणि ‘हीर’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. यानंतर तिला अनेक चित्रपटात गाणे गाण्याची ऑफर मिळाली. परंतु, दरम्यान रानू मंडल अचानक गायब झाली.

यानंतर काही दिवसांनी रानूच्या खांद्याला एका चाहत्याने स्पर्श केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी रानूने चुकीचे वर्तन केल्याने तिला ट्रोल केलं गेलं. याशिवाय तिने केलेल्या गडद रंगाच्या मेकअपमुळेही तिला ट्रोल केले गेले होतं.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button