#शेतकरी आंदोलन : हरियाणात उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळला - पुढारी

#शेतकरी आंदोलन : हरियाणात उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळला

झज्जर, पुढारी ऑनलाईन : कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र होत असून आज हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमादरम्यान पोलिस आणि आंदोलकांत धुमश्चक्री उडाली ( #शेतकरी आंदोलन ). आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा मारला तरीही आंदोलकांनी पोलिसांना जुमानले नाही.

हरियाणातील झज्जर येथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा एक कार्यक्रम होणार होता. त्याच्याविरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले.

सकाळीच मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आंदोलक हातात झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाली.

ते कार्यक्रमस्थळाकडे जात असताना आंदोलकांना रोखले.

आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेटस लावण्यता आले होते मात्र, ते उखडून फेकले.

पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही आंदोलकांनी त्यालाही जुमानले नाही.

कोकण रेल्वे महाव्यवस्थापक संजय गुप्ता यांची महाडला भेट

Ileana D’Cruz : इलियानाचा बोल्ड अवतार पाहून म्हणाल, कोई इतना खूबसुरत कैसे हो सकता हैं….!

हरयाणात आंदोलक शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत.

पीक खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतल्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत.

गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत.

या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे.

हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनाही विरोध होत आहे.

( #शेतकरी आंदोलन )२ ऑक्टोंबर पासून धान्य खरेदी प्रक्रिया सुरू केली जावी, अन्यथा एकाही नेत्याला, आमदार आणि खासदाराला बाहेर पडता येणार नाही, असा इशारा शेतकरी नेते गुरनाम सिंग यांनी दिला आहे.

सुप्रीम कोर्टाची नोटीस

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनप्रश्नी सुप्रीम कोर्टात काल सुनावणी झाली. नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी फक्त २० मिनिटे लागत असनाता सध्या त्यासाठी २ तास वेळ लागत आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीसही बजावली होती. गाझियाबदमधील वाहतुकीच्या ढिसाळ नियजोनावरून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या उच्च अधिकाऱ्यांची ९ सदस्यीय समिती नेमून वाहतूक व्यवस्थापनावर अहवाल मागितला होता.

 

 

हेही वाचा : 

Back to top button