Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!!!

Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!!!
Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!!!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेक्स : सरकारची एअर इंडियाची (Air India) पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही २०१८ साली सरकारने कंपनीचे ७६ टक्के शेअर विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता.

१९३२ साली टाटांनी सुरू केली होती विमानसेवा

जे. आर. डी. टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअर सर्विसेज सुरु केली होती. त्यानंतर टाटा एअरलाइन्स झाली. २९ जुलै १९४६ रोजी ती पब्लिक लिमिडेट कंपनी झाली. १९५३ मध्ये सरकारने टाटा एअरलाइन्सला विकत घेतले आणि ती सरकारी कंपनी बनली. सरकारच्या कर्जामध्ये अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी जानेवारी २०२० पासून गुंतवणूक प्रक्रिया सुरु झाली होती.

दरम्यान, देशात कोरोना महारोगराईची परिस्थिती निर्माण झाली. ही प्रक्रिया त्यामुळे १ वर्षापर्यंत स्थगित झाली. यंदाच्या वर्षात एप्रिलमध्ये सरकारने इच्छुक कंपन्यांनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी आर्थिक बोली लावली. यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम तारीख ठेवली गेली होती.

आर्थिक बोली लावण्यासाठी अंतिम तारखेत वाढ केली जाणार नाही, असे नुकतेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत सरकारकडे काही कंपन्यांची आर्थिक बोली आली होती. सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियाचा ७६ टक्के भाग विक्री करण्याचा विचार केला होता. पंरतु, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सरकारने या वर्षात कंपनीचा १०० टक्के भाग विक्री करण्याची घोषणा केली.

या डिलमध्ये १५०० करोडचं मुंबईचं ऑफिसही…

एअर इंडिया कंपनीचे मुंबईतील हेड ऑफिस आणि दिल्लीतील एअरलाईन्स हाऊसदेखील या डिलमध्ये सामील आहे. सध्यस्थितीत मुंबईतील एअर इंडियाचं ऑफिस सुमारे १५०० करोडपेक्षाही जास्त आहे. एअर इंडिया कंपनीचे देशामध्ये ४४०० आणि विदेशात १८०० लॅंडिंग आणि पार्किंग स्लाॅटला नियंत्रित करते.

पण, प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली ही कंपनी

ही कंपनी (Air India) विकण्याचे प्रयत्न सरकारचे पहिल्यापासून सुरू होते. मात्र त्यांना यश मिळलं नाही. २०१८ मध्ये ७६ टक्के शेअर विकण्याचा निर्णय घेतला होता. पण, सरकारने त्यावेळी सरकारने मॅनेजमेंट कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याची भूमिका घेतली होती. जेव्हा या भूमिकेमुळे ही कंपनी विकत घेण्यात कुणी रस दाखवला नाही तेव्हा सरकारने मॅनेजमेंट कंट्रोलसहीत कंपनी विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डील झाली आहे. सध्या एअर इंडियावर ६० हजार ७४ कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र, खरेदी करणाऱ्याला कंपनीला २३,२८६.५ कोटी द्यावे लागणार आहेत.

पहा व्हिडीओ : गोल्डन बॉय नीरज चोपडा भारावला आपले मोझॅक पोर्ट्रेट बघून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news