नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये १.१७ लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली.
ऑगस्ट महिन्यात जीएसटी करवसुलीचा आकडा १.१२ लाख कोटी रुपये इतका होता.
चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतील जीएसटी करवसुलीचा आकडा ६.८२ लाख कोटी रुपयांवर गेला असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सलग तिसर्या महिन्यात करवसुलीचे आकडे एक लाख कोटी रुपयांच्या पुढे राहिलेले आहेत.
कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे हे लक्षण असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सप्टेंबर २०२० च्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये जीएसटी वसुली त झालेली वाढ २३ टक्क्यांनी जास्त आहे.
सप्टेंबरमध्ये सेंट्रल जीएसटीमधून सरकारला २० हजार ५७८ कोटी रुपये प्राप्त झाले.
स्टेट जीएसटीमधून २६ हजार ७६७ तर आयजीएसटीमधून ६० हजार ९११ कोटी रुपये प्राप्त झाले.
याशिवाय उपकरांच्या माध्यमातून ८ हजार ७५४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
हेही वाचा :