पिंपरी : चांगली बातमी ! डेंग्यूची साथ आली आटोक्यात ; महिनाभरात बाधित रुग्णसंख्या शून्यावर | पुढारी

पिंपरी : चांगली बातमी ! डेंग्यूची साथ आली आटोक्यात ; महिनाभरात बाधित रुग्णसंख्या शून्यावर

पिंपरी : शहरातील डेंग्यूची साथ सध्या आटोक्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात डेंग्यूचे 6 बाधित रुग्ण आढळले होते. तर, जानेवारी महिन्यात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. तथापि, 261 संशयित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णसंख्येचा गतवर्षीचा आलेख पाहता जानेवारी-2022 मध्ये डेंग्यूचे 2 बाधित रुग्ण आढळले होते.

तर, फेब्रुवारी ते मे अशा चार महिन्यांमध्ये मात्र एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. त्याचप्रमाणे, यंदाही जानेवारी महिन्यात डेंग्यूचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. गेल्या वर्षीच्या बाधित रुग्णसंख्येशी तुलना करता पुढील काही महिन्यांमध्येही डेंग्यूची साथ नियंत्रणात राहण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रुग्णांचा आलेख घसरला
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे सर्वांधिक 98 बाधित रुग्ण आढळले होते. तर ऑक्टाबरमध्ये ही संख्या काही प्रमाणात घटून 89 वर आली होती. त्यानंतर मात्र रुग्णांचा आलेख घसरता राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये 38 आणि डिसेंबर महिन्यात फक्त
6 बाधित रुग्ण आढळले आहेत.

Back to top button