पिंपरी : महिलेला मारहाण करीत विनयभंग; दोघांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : महिलेला मारहाण करीत विनयभंग; दोघांवर गुन्हा

पिंपरी : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने महिलेसह तिच्या आई व भावाला मारहाण करीत विनयभंग केला. देहूरोड येथे बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित 24 वर्षीय महिलेने याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विजय सुरेंद्र सुतार (वय 18), शिवशंकर सुरेंद्र सुतार (20, दोघेही रा. देहूरोड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा
दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, गैरवर्तन करून फिर्यादी यांचा विनयभंग केला. फिर्यादीच्या भावालादेखील हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तरुणीचा विनयभंग
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतरही आरोपीने पुन्हा तरुणीच्या घराजवळ येऊन आरडाओरडा करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज भारत पवार (26, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

Back to top button