पुणे : पेठ येथे दोन दिवसांत धावले 320 बैलगाडे | पुढारी

पुणे : पेठ येथे दोन दिवसांत धावले 320 बैलगाडे

पेठ : पुढारी वृत्तसेवा :  पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वेताळ बुवा यात्रेनिमित्त दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत 320 बैलगाडे सहभागी सहभागी झाले होते. गेल्या नऊ वर्षांत प्रथमच बैलगाडा शर्यत झाल्याने या वर्षी एक लाख लोकांनी दोन दिवस बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी गर्दी केली होती. ही माहिती यात्रा कमिटीचे प्रमुख व सरपंच राम तोडकर यांनी दिली.
बैलगाडा स्पर्धेच्या घाटाचे उद्घाटन यात्रा प्रवर्तक बाबाजीशेठ तोडकर व माजी सरपंच रघुनाथ तोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.

पहिल्या दिवशी पहिल्यात पहिला क्रमांक मारुती रामभाऊ एरंडे, द्वितीय क्रमांक शुभम तांबडे, दुसरा दिवस पहिल्यात पहिला क्रमांक विकास अंकुश नायकोडी, द्वितीय क्रमांक एकनाथ सुदाम एरंडे, 20 फूट कांडे प्रकारमध्ये विकास अंकुश नायकोडी, पहिला दिवस घाटाचा राजा मान वर्पे वारींगे जुगलबंदी यांना मिळाला. दुसरा दिवस घाटाचा राजा किसनराव भीमराव वाकचौरे यांना मिळाला. दोन दिवसांत या स्पर्धेत 320 बैलगाडे धावले. या स्पर्धेस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका भाजपाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, शरद बँकेचे संचालक व माजी सरपंच संतोष धुमाळ यांनी भेट देऊन बैलगाडाशौकीन व मालक यांना शुभेच्छा दिल्या. दोन दिवस बैलगाडा घाटातील समालोचन साहेबराव आढळराव पाटील, लक्ष्मण बांगर, माउली पिंगळे, माउली तळेकर यांनी केले. यात्रा कमिटी सदस्य यांनी यात्रेची व्यवस्था पाहिली.

Back to top button