केसरकरांकडून आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

केसरकरांकडून आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे बरे चालले असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम जाणीवपूर्वक करीत आहेत. ‘राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याचे काम केले जाते, पण उद्धव ठाकरे यांच्या ते लक्षात येत नाही’, या त्यांच्या विधानात काहीही तथ्य नाही, असे मत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. बारामतीत कृषी प्रदर्शनानिमित्त ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, शिवसेनेसंबंधी जो काही कायदेशीर निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल, तो लवकर घेतला पाहिजे. न्यायाला होणारा उशीर हा अन्यायकारक असतो. सगळ्यांचे डोळे आता न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहेत. त्या अनुषंगाने काय परिणाम होतात, त्याला सामोरे जावे लागेल.

Back to top button