पुणे : पीएमपीला एका दिवसात दीड कोटी; 1779 बस रस्त्यावर | पुढारी

पुणे : पीएमपीला एका दिवसात दीड कोटी; 1779 बस रस्त्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला गुरुवारी पहिल्यांदाच दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. जवळपास एकाच दिवशी 1 कोटी 70 लाख रुपयांचे उत्पन्न प्रशासनाला गुरुवारी मिळाले. हे पीएमपीला आतापर्यंत मिळालेले रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आहे.पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 124 बस आहेत. त्यापैकी 1650 बस नियमित मार्गावर असतात. तर काही देखभाल-दुरुस्ती, ब्रेकडाऊन यांसारख्या कारणाने बंद असतात. मात्र, गुरुवारी सर्वाधिक 1779 बस मार्गावर होत्या, त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध झाल्या अन् पीएमपीला जादाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळाले.

अशी होती स्थिती…
12 लाख 68 हजार प्रवाशांनी केला प्रवास
1 हजार 779 बस होत्या मार्गावर
20 हजार 451 फेर्‍या दिवसभरात झाल्या
14 लाख रुपये पासचे उत्पन्न
1 कोटी 56 लाख रुपये तिकिटाचे उत्पन्न
1 कोटी 70 लाख रुपये दिवसभराचे एकूण उत्पन्न

पीएमपीला महिन्याला मिळणारे उत्पन्न…
वाहतूक उत्पन्न – 43 कोटी 50 लाख रुपये
जाहिरात उत्पन्न – 60 लाख रुपये
मिळकत भाडे – 60 लाख रुपये
स्क्रॅप, दंड व इतर – 1 कोटी रुपये
महिन्याचे एकूण उत्पन्न – 45 कोटी 70 लाख रुपये

पीएमपीचा दरमहा होणारा खर्च
सेवकांचे पगार – 37 कोटी रुपये
सीएनजी (एमएनजीएल) – 26 कोटी रुपये
डिझेल आणि ऑईल – 2 कोटी रुपये
बस देखभाल दुरुस्ती – 2 कोटी 50 लाख रुपये
ई-बस इलेक्ट्रिसीटी – 1 कोटी 47 लाख रुपये
इतर अत्यावश्यक खर्च – 2 कोटी 10 लाख रुपये
तोषदान आणि रजा रोखीकरण – 3 कोटी रुपये
भाडेतत्त्वावरील बसभाडे – 24 कोटी 62 लाख रुपये
सर्व प्रकारचे कर – 1 कोटी 94 लाख रुपये
वैद्यकीय खर्च – 60 लाख रुपये
महिन्याचा एकूण खर्च – 101 कोटी 23 लाख

आम्ही प्रवासी केंद्रित सेवा पुरविण्यावर भर देत आहोत. त्यानुसार आम्ही दररोज ज्यादा बस मार्गावर सोडणार असून, मार्गांचे फेरनियोजन करण्यात येत आहे. तसेच, पीएमपीचे प्रवासी वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
                                                                     – सतीश गव्हाणे,
                                                     मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Back to top button