पुणे : पुढील 35 वर्षांनंतर वृद्ध होणारा देश भारत असेल; एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : पुढील 35 वर्षांनंतर वृद्ध होणारा देश भारत असेल; एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढची पिढी घडविण्यात पुण्याचे मोठे योगदान आहे. राजामाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे अशी अनेक उदाहरणे आपण याच मातीत पाहिली आहेत. भारत सर्वांत तरुण देश आहे. हे आपण अभिमानाने सांगतो. पण पुढील 35 वर्षांनंतर वृद्ध होणारा देश भारत असेल, असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे माउली व प्रेरणा पुरस्कारप्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, अ‍ॅड. सुभाष मोहिते, दिलीप मोहिते, शिरीष मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल मोहिते आदी उपस्थित होते.

यावेळी माउली पुरस्कार दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर यांना आणि प्रेरणा पुरस्कार अहमदनगर येथील माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अनिल कवडे, डॉ. राजेंद्र धामणे आदींनी मनोगत व्यक्त केले. श्वेता ढमाळ यांनी प्रास्ताविक, तर प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.

Back to top button