मेंगडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी | पुढारी

मेंगडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : मेंगडेवाडी येथील जुनी स्मशानभूमी परिसरात राहणा-या ऊसतोड कामगारांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळीच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ऊसतोड कामगार नितीन शिंदे (रा. खर्डा, तालुका जामखेड, जि. अहमदनगर ) यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला.

शेळीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने शिंदे बाहेर आले असता बिबट्याने शेळीला पकडले होते. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करत बिबट्याच्या बाजूने दगड फेकून मारले असता बिबट्या पळून गेला. मात्र, या हल्ल्यात शेळीच्या गळ्याला जखम झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती कळताच वनमजूर दशरथ मेंगडे यांनी घटनास्थळी येऊन महिती घेतली आहे.

Back to top button