धक्कादायक! आजोबाकडून नातीवर अत्याचार; ‘गूड टच-बॅड टच’च्या सत्रात फुटली वाचा | पुढारी

धक्कादायक! आजोबाकडून नातीवर अत्याचार; ‘गूड टच-बॅड टच’च्या सत्रात फुटली वाचा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरा वर्षीय नातीवर तिच्याच आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील गूड टच- बॅड टच सत्रात संबंंधित मुलीने आपबिती सांगितली. या प्रकरणी कोंढवा पोलिसानी 60 वर्षीय आजोबाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर 2022 मध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षिका असून, चौथीच्या वर्गात बॅड टच आणि गूड टचचे सत्र घेत होत्या. पीडित मुलगी त्या सत्रात सहभागी होती. त्या वेळी तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी शिक्षिकेला सांगितली. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षिकेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती गुन्हे निरीक्षक संजय मोगले यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

Back to top button