आणे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ | पुढारी

आणे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

बेल्हे(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : आणे  शिवारात बिबट्याने रविवारी (दि. 8) रात्री पाळीव जनावरांचा फडशा पाडला. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आणे गावातील बाबू दाते, दिनकर आहेर या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरेवस्तीवर शिवारात दबा धरलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करीत चेतन डोंगरे यांच्या कालवडीवर हल्ला केला. कालवड ठार मारल्यानंतर दोन शेळ्या जबड्यात पकडून बिबट्याने धूम ठोकली.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात कालवड आणि शेळ्या ठार झाल्याची माहिती बेल्हे वनपाल कार्यालयाला मिळताच वनरक्षक जिजाभाऊ भडलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.आणे पठार भागातील डोंगरेवस्ती, आनंदवाडी परिसरातील शेतकर्‍यांची पाळीव जनावरे बिबट्या ठार मारत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. आणेसह नळावणे, पेमदरा, शिंदेवाडी, आनंदवाडी, कल्याणवाडी परिसरात बिबट्याची दहशत आहे. वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button