खेड-शिवापूर टोलनाक्यावर रांगा | पुढारी

खेड-शिवापूर टोलनाक्यावर रांगा

खेड-शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरासह इतर भागांतील पर्यटक कोकण, गोवा, महाबळेश्वर, पाचगणी याठिकाणी गेले होते. ते परतीच्या प्रवासाला निघाल्याने रविवारी (दि. 1) खेड-शिवापूर टोलनाक्यावर सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टोलनाक्यावर सातारा बाजूने पुणे बाजूकडे जाणार्‍या सर्वच लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे कापूरहोळ (ता. भोर), खेड-शिवापूर बंगला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक अस्लम खतीब व कर्मचारी तैनात असूनही वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होत होता. सहायक पोलिस निरीक्षक अस्लम खतीब म्हणाले, पर्यटनासाठी गेलेले नागरिक रविवारी परतू लागल्याने टोलनाक्यावर व महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

Back to top button