पुणे : जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण | पुढारी

पुणे : जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

पुणे : जमिनीच्या वादातून नात्यातील एका महिलेने दुसर्‍या महिलेला दगडाने मारहाण करून गंभीररीत्या जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी लोणी काळभोरमधील वीरकर मळा परिसरात घडली. याप्रकरणी सुजाता सावंत हिच्या विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा वीरकर असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांनी फिर्याद दिली आहे.

सुजाता आणि मनीषा नणंद-भावजय आहेत. 27 डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास सुजाताने मनीषाला जुन्या भांडणाच्या रागातून आणि जमिनीच्या वादातून भांडण केले. त्यांना जिवे मारण्याच्या हेतूने सुजाताने हातातील दगड आणि काठीने मनीषाला बेदम मारहाण केली.

Back to top button