चाकण : आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले | पुढारी

चाकण : आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत किंचित घट होऊन भावात 900 रुपयांची उच्चांकी वाढ झाली. वाटाणा, मेथी व भेंडीचे भाव तेजीत राहिले आहेत. लसूण व टोमॅटोचे भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व शेपूची भरपूर आवक झाली. गुरांच्या बाजारात म्हैस व शेळ्या-मेंढ्याच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 50 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,100 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 400 क्विंटलने घटल्याने भावात 900 रुपयांची उच्चांकी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 400 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 2 हजार 250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने घटून भावात 500 रुपयांची घसरण झाली.

बटाट्याचा कमाल भाव 2 हजार 300 रुपयांवरून 1 हजार 800 रुपयांवर स्थिरावला. बंदूक व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 20 क्विंटलने वाढून कमाल भाव 4 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 215 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 93 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 2 ते 3 हजार रुपये भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 1 हजार 100 क्विंटल. भाव क्रमांक 1 – 2 हजार 400 रुपये, भाव क्रमांक 2 – 2 हजार रुपये, भाव क्रमांक 3 – 1 हजार 500 रुपये.
बटाटा : एकूण आवक – 2 हजार 250 क्विंटल. भाव क्रमांक 1 – 1 हजार 800 रुपये, भाव क्रमांक 2 – 1 हजार 500 रुपये, भाव क्रमांक 3 – 1 हजार 300 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो – 292 क्विंटल (500 ते 1,000 रु.), कोबी – 212 क्विंटल (400 ते 600 रु.), फ्लॉवर – 270 क्विंटल (500 ते 800 रु.), वांगी – 102 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), भेंडी – 87 क्विंटल (2,500 ते 3,000 रु.), दोडका – 63 क्विंटल (1,000 ते 2,000 रु.), कारली – 73 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), दुधीभोपळा – 62 क्विंटल (500 ते 1,500 रु.), काकडी – 69 क्विंटल (1,000 ते 2,000 रु.), फरशी – 60 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), वालवड – 83 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), गवार – 63 क्विंटल (3,000 ते 6,000 रु.), ढोबळी मिरची – 108 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), चवळी – 62 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), वाटाणा – 285 क्विंटल (2,100 ते 2,600 रु.), शेवगा – 8 क्विंटल (5,000 ते 10,000 रु.), गाजर – 158 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 35 हजार 60 जुड्या (500 ते 700 रु.), कोथिंबीर – एकूण 28 हजार 500 जुड्या (300 ते 500 रु.), शेपू – एकूण 5 हजार 460 जुड्या (400 ते 600 रु.), पालक – एकूण 2 हजार 100 जुड्या (300 ते 600 रु.)
जनावरे : चाकण येथे विक्रीसाठी आलेल्या 190 म्हशींपैकी 170 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 15 ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या-मेंढ्यांची संख्या देखील वाढली असून, विक्रीसाठी आलेल्या 9,350 शेळ्यांपैकी 8,910 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button