पुणे : गुलछडी, लिलीला थंडीचा फटका | पुढारी

पुणे : गुलछडी, लिलीला थंडीचा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : थंडीस सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम गुलछडी आणि लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फुलांची आवक रोडावली असून प्रतवारीतही घसरण झाली आहे. लग्नसराई तसेच मार्गशीर्ष संपल्याने मार्केट यार्डातील फुलबाजारात शोभिवंत फुलांसह अन्य फुलांना मागणी घटली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 20-40, गुलछडी : 20-50, अष्टर : जुडी 5-10, सुट्टा 40-50, कापरी : 10-30, शेवंती : 30-50, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-20, गुलछडी काडी : 20-80, डच गुलाब (20 नग) : 50-200, जर्बेरा : 10-30, कार्नेशियन : 100-150, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-550, ग्लडिओ (10 काड्या) : 80-120, जिप्सोफिला : 200-300.

Back to top button