पुणे : लग्न झाल्याचे बनावट व्हिडिओ केले व्हायरल; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : लग्न झाल्याचे बनावट व्हिडिओ केले व्हायरल; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीच्या लग्नाचे बनावट व्हिडिओ तयार करून तिचे लग्न झाल्याचे भासविण्यासाठी ते व्हायरल करणार्‍या दोघांवर बदनामी व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक होळकर (22, रा. होळकरवाडी, हडपसर) आणि राज शेवाळे (रा. शेवाळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 16 वर्षांच्या मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक होळकर हा पीडित तरुणाचा मित्र आहे. तो नेहमी फिर्यादीची छेड काढत असे. त्या वेळी फिर्यादीच्या घरच्यांनी त्याला समज दिली होती. तरीदेखील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना मुलीबरोबर लग्न झाल्याचे भासविण्यासाठी दोघांच्या लग्नाचे बनावट व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवर फिर्यादीस पाठवून तिची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button