पुणे विमानतळावरून सर्वाधिक 186 उड्डाणे | पुढारी

पुणे विमानतळावरून सर्वाधिक 186 उड्डाणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळानंतर पुणे विमानतळावरून पहिल्यांदाच शुक्रवारी (दि. 23) एकाच दिवशी 186 विमानांची ये-जा झाली. त्याद्वारे सर्वाधिक 31 हजार 52 प्रवाशांनी प्रवास केला. नाताळच्या सुट्यांमुळे ही गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. पुणे विमानतळावरून शुक्रवारी दिवसभरात 93 विमानांनी उड्डाण केले, तर तितकीच विमाने पुणे विमानतळावर राज्यातील विविध विमानतळांवरून आली. अशी एकूण 186 विमानांची एकाच दिवसात ये-जा झाली. यात 15 हजार 872 प्रवासी पुण्यातून बाहेर गेले, तर 15 हजार 180 प्रवासी पुण्यात आल्याची पुणे विमानतळ प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे. ही कोरोनाकाळानंतर एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या असल्याचे सांगितले जात आहे.

तीन महिन्यांत उड्डाणांमध्ये वाढ
या वर्षी 23 सप्टेंबरला पुणे विमानतळावर 156 सर्वाधिक विमान उड्डाणांचे रेकॉर्ड झाले होते. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यातील 23 तारखेलाच पुणे विमानतळावर नवे रेकॉर्ड झाले आहे.

23 डिसेंबरची उड्डाणे
आगमन झालेली विमाने : 93 प्रवासी : 15180
निर्गमन झालेली विमाने : 93 प्रवासी : 15872

23 सप्टेंबरची उड्डाणे
आगमन झालेली विमाने : 77 प्रवासी : 11133
निर्गमन झालेली विमाने : 79 प्रवासी : 11474

Back to top button