भोर : आंबाडखिंड घाटातील रस्त्याची दुरुस्ती | पुढारी

भोर : आंबाडखिंड घाटातील रस्त्याची दुरुस्ती

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर आंबाडखिंड घाटातील रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. जानेवारी महिन्यात मांढरगडा (ता. वाई) वरील श्री काळुबाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तांना तसेच वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, भाविक भक्तांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर यांनी यात्रेच्या एक महिना अगोदर आंबाडखिंड (ता. भोर) घाट परिसर वाहतुकीसाठी सज्ज केला आहे.

काळुबाई देवी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक भोर -आंबाडखिंड घाट मार्गे येत असतात. काळुबाई देवी यात्रा एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. या मार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहन चालकांना यात्रा काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, गवत – वेली याची साफसफाई केली. तसेच रस्त्यावरील खडड्यांची डागडुजी करून दिशादर्शक फलक बसविले.

Back to top button