पुणे : तीन घरफोडीच्या घटनांत दहा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पुणे : तीन घरफोडीच्या घटनांत दहा लाखांचा ऐवज लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत चोरट्यांनी घरफोडी करीत तब्बल 10 लाखांचा ऐवज चोरून नेला. बहुतांश ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून ऐवज चोरी केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी फरासखाना, विश्रांतवाडी, लोणी काळभोर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाहून आल्यानंतर त्यात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश चव्हाण तपास करीत आहेत.

पहिल्या घटनेत धानोरी रस्त्यावरील आदित्य वाइन्सचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख 22 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 28 नोव्हेंबरला घडली असून, आदित्य पाटील (वय 38) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसर्‍या घटनेत बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 25 नोव्हेंबरला लोणी काळभोरमधील मेरीगोल्ड इमारतीत घडली. याप्रकरणी रमेशकुमार शहा (वय 49, रा. कोथरूड) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

तिसर्‍या घटनेत, बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागदागिने मिळून 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 29 नोव्हेंबरला विश्रांतवाडीतील प्रजासत्ताक कॉलनीत घडली. याप्रकरणी व्यनकाटेश्वर कोली (वय 31, यांनी विश्रांतवाडी) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी व्यनकाटेश्वर कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

 

Back to top button