दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’: आजपासून रंगणार महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’: आजपासून रंगणार महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेला गुरुवार दि. 24 नोव्हेंबरपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मुली आणि महिलांनी आपला सहभाग नोंदवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धा गुरुवार दि. 24 ते रविवार दि. 27 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 8 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला दिशा अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संस्थापक रवी देशमुख, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन प्रा. डॉ. संजय चोरडिया, एसकेपी शैक्षणिक संकुल, बालेवाडी आणि श्री खंडेराज प्रतिष्ठानचे चेअरमन डॉ. सागर बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप आणि बाप्टिस डिसुझा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेमध्ये 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि खुल्या गटामध्ये महिला सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 60 मीटर, 200 मीटर, 800 मीटर, 1000 मीटर, 1500 मीटर, 3000 मीटर, 5000 मीटर, 80 मीटर अडथळा, 100 मीटर अडथळा, 4 बाय 100 रिले, 2-3-4 किलोमीटरची क्रॉसकंट्री अशा विविध प्रकारांत खेळाडू आपले कौशल्य दाखविणार आहेत.

Back to top button