शिक्रापूरच्या सरपंचांना शिवीगाळ करत धक्काबुक्की | पुढारी

शिक्रापूरच्या सरपंचांना शिवीगाळ करत धक्काबुक्की

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर(ता. शिरूर)चे सरपंच रमेश गडदे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करत करत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू(रा. शिक्रापूर, ता. शिरूर) या सर्वांवर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत समोरील हनुमान मंदिराशेजारून जात असताना उद्धव झोडगे यांनी त्यांचा टेम्पो (एमएच 12 आरएन 1891) नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होईल अशा पद्धतीने लावला होता.
यामुळे सरपंच गडदे यांनी झोडगे याला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले.

टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात राग धरून सरपंच रमेश गडदे यांना धक्काबुक्की, दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. या प्रकाराबाबत सरपंच रमेश बबनराव गडदे (वय 48, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा तपास शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी करीत आहेत.

Back to top button