कामशेतची वाहतूक कोंडी कधी सुटणार? | पुढारी

कामशेतची वाहतूक कोंडी कधी सुटणार?

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : कामशेत ही मावळ तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. पण या शहरात आजूबाजूच्या परिसरातील व नाणे मावळ पवन मावळ गावातील लोकखरेदीसाठी येत असतात. पण येणारे लोक टू व्हीलर,फोर व्हीलर गाड्या घेऊन येतात. त्या गाड्यांना पार्किंगची सोय नसल्याने गाड्या रस्त्यावर कुठेही लावल्या जातात. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असते.
कामशेतची वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. कारण रस्त्यावरून पायी चालणे पण अवघड झाले आहे. ही कोंडी कधी सुटणार, हा प्रश्न कामशेत येथील नागरिकांना पडला आहे.

कामशेत येथील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे ही कोंडी लवकर सुटणार नाही, असे वाटते. जर ही समस्या सुटली नाही, तर भविष्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यासाठी आंदोलन करेल.
                         -कोंडिबा रोकडे, प्रवक्ते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष,पुणे जिल्हा

कामशेत येथील रस्ते सिटी सर्व्हे 9 मीटरप्रमाणे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई सध्या करता येत नाही. पुनर्मूल्यांकन करावे लागेल व भूमीलेख विभागामार्फत मोजणी करून कारवाई करावी लागेल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी.

                              -राजेसाहेब आगळे, पी.डब्लू.डी अभियंता, कामशेत विभाग

कामशेतमधील वाहतूक कोंडीची कारणे
1) कामशेत मध्ये गाड्या पार्किंगची सोय नाही.
2) वाहनचालक रस्त्यावर गाडी लावतात व गायब असतात.
3) रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले, त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली व उंची वाढली, त्यामुळे गाड्या दुकानासमोर लावली जातात.
4) रस्त्याच्या दोन्ही बाजूस चारचाकी गाडी उभ्या केलेल्या असतात.
5) प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही.
6) पोलिस यंत्रणा कमी पडते.
7) ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव.
8) स्थानिक राजकीय पक्षांची उदासीनता.
9) रस्त्याच्या बाजूला असणारे अतिक्रमण.
10) कोणत्याही प्रकारची उपाय योजना राबवली जात नाही.

Back to top button