पिंपरी : पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पिंपरी : पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी : पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने एजंटने एकाची दोन लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2014 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अ‍ॅक्सिस बँक, हिंजवडी येथे घडला. सयाजी रावसाहेब ओलेकर (42, रा. हिंजवडी. मूळ रा. सांगली) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सचिन काशिनाथ डिसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन डिसले याने फिर्यादी यांच्या मुलीचा विमा काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख 40 हजार रुपये घेतले. तसेच, घेतलेल्या पैशांची पावती न देता ओलेकर यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button