पाषाण तलावाच्या परिसरातील कचरा उचलण्याची मागणी | पुढारी

पाषाण तलावाच्या परिसरातील कचरा उचलण्याची मागणी

बाणेर : सुतारवाडी परिसरातील महामार्गालगत महादेव मंदिर व पाषाण तलाव परिसरात कचरा साचला आहे. महापालिका व महामार्ग प्राधिकरण प्रशासनातील समन्वयाच्या अभावाने ही समस्या निर्माण झाली असून, हा कचरा उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाषाण तलाव परिसर व महादेव मंदिरालगत साचलेला कचरा उचलून या ठिकाणी जाळ्या बसविण्याची मागणी माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार यांनी महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी जाळ्या बसविल्यास नागरिकांना कचरा टाकण्यास अटकाव होईल. महादेव मंदिर परिसराबरोबरच पाषाण तलावाचे होणारे प्रदूषणही रोखले जाईल. यामुळे तातडीने उपा योजना करणे आवश्यक असल्याचे सुतार यांनी सांगितले. सहायक आयुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले की, जाळ्या बसविल्यास पडणार्‍या कचर्‍याला आळा बसेल, त्याचबरोबर पाषाण तलाव परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. गेल्या महिनाभरात जवळपास या ठिकाणाहून 60 टन कचरा उचलला आहे. त्यामुळे महामार्ग विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button