तळेगाव: फटाका स्टॉल उभारण्याची लगबग | पुढारी

तळेगाव: फटाका स्टॉल उभारण्याची लगबग

तळेगाव: दिवाळी अवघ्या चार ते पाच दिवसावर आली असल्यामुळे यासाठी फटाका व्यावसायिकांची स्टॉल उभारण्याची लगबग सुरु आहे. तळेगाव स्टेशन भागातील संत ज्ञानेश्वर शाळेजवळील प्रांगणात फटाका विक्रेत्यांचे २३ ते २५ स्टॉल उभारण्याची कामे सुरु आहेत. सध्या पावसाळी वातावरणामुळे शेड उभारणीस अडचणी येत असुन विक्रेत्यांची धावपळ होत आहे. कामगारांची मजुरी, फटाक्यांची वाहतूक करणे, फटाके भिजू नये यासाठी खबरदारी घेणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी स्टॉल उभारण्याचे काम सुरु असल्यामुळे, या कामासाठी मजुरांची कमतरता भासत असुन स्वतः व्यावसायिकही याकामी परिश्रम घेत आहेत. यावेळी फटाक्यांचे दरही वाढले आहे.

Back to top button