पुणे: राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदक प्रदान | पुढारी

पुणे: राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदक प्रदान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील 114 पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांना राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच पोलिस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये पुण्यातील अधिकार्‍यांना पोलिस पदके प्रदान करण्यात आली.

यामध्ये विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा, स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा शैलेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र गायकवाड (सेवानिवृत्त), वाहतुक शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल यादव (सेवानिवृत्त), लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, तत्कालीन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गायकवाड (सेवानिवृत्त) यांना राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदक प्रदान करण्यात आले.

Back to top button